Join us

मार्चअखेरपर्यंत महिला संचालक नियुक्त करा

By admin | Updated: March 15, 2015 23:43 IST

सर्व नोंदणीकृत कंपन्यांना मार्चअखेर संचालक मंडळावर किमान एका महिलेची संचालकपदी नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय रोखे आणि

मुंबई : सर्व नोंदणीकृत कंपन्यांना मार्चअखेर संचालक मंडळावर किमान एका महिलेची संचालकपदी नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) दिले आहे. अन्यथा नियमानुसार कारवाईचा इशाराही सेबीने दिला आहे.नोंदणीकृत अग्रणी ५०० कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही महिला नाही. महिला संचालक नियुक्त करण्यासंबंधी देण्यात आलेल्या मुदतीचे काटेकोरपणे पालन होईल, याकडे शेअर बाजाराने लक्ष द्यावे. ही मुदत १५ दिवसांनंतर संपणार असल्याने सेबीने स्वत:हून १६० कंपन्यांना पत्र पाठवून या निर्देशाचे पालन करण्यास सांगितले आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयानेही नोंदणीकृत कंपन्यांना १ एप्रिलपर्यंत किमान एक महिला संचालकपदी नियुक्ती करण्याबाबत सूचित करावे, अशी गळ सेबीने कंपनी व्यवहार मंत्रालयाला घातली आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेलाही या नियमाचे पालन होईल, याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी नवीन कंपनी कार्यान्वयन नियमानुसार सेबीने सर्व नोंदणीकृत कंपन्यांना १ आॅक्टोबर २०१४ पर्यंत संचालक मंडळावर किमान एक महिला संचालकपदी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते; नंतर ही मुदत १ एप्रिल २०१५ पर्यंत वाढविली.