Join us  

‘अ‍ॅपल’चे बाजारभांडवल एक ट्रिलियन डॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:10 AM

आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपची (बाजार भांडवल) कंपनी बनली आहे.

न्यूयॉर्क : आयफोन बनविणारी कंपनी ‘अ‍ॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपची (बाजार भांडवल) कंपनी बनली आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी ‘अ‍ॅपल’ केवळ १६ अब्ज डॉलरने मागे होती. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा मान प्राप्त केला आहे.‘अ‍ॅपल’नंतर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी अ‍ॅमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे. ‘अ‍ॅपल’चे शेअर आज २०७.०५ अमेरिकी डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि कंपनीने एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला. ‘अ‍ॅपल’ने मंगळवारीच आपल्या तिमाही परिणामांची माहिती देताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ पाहावयास मिळाली. १९९७ मध्ये ‘अ‍ॅपल’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले. जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ‘अ‍ॅपल’ला एका नव्या उंचीवर नेले.फोनच्या किमतीत वाढकंपनीने आपल्या सर्व यापूर्वीच्या मॉडेल्समध्ये २० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीच्या आयफोनची विक्री १ टक्का वाढली आहे; पण उत्पन्नात १७ टक्के वाढ झाली आहे. सीईओ टीम कुक यांच्या म्हणण्यानुसार, किमती जास्त असूनही आयफोन-एक्स सर्वांत लोकप्रिय फोन राहिलेला आहे. याची किंमत ९९९ डॉलरपासून सुरू होते.

टॅग्स :अॅपल