Join us  

पैसे कमवण्याचा आणखी एक पर्याय; बचत खाते असेल, तर 'ही' योजना वापरून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 6:54 AM

मोठ्या आणि नामांकित बँका बचत खात्यावर २.७० टक्के ते ३.५० टक्क्यांपर्यंत व्याज देतात. बँकनिहाय हा व्याजदर वेगवेगळा असतो.

आपल्या जमापूँजीवर अधिक व्याज मिळत असेल तर ते प्रत्येकाला हवेच असते. त्यासाठी मग जी बँक अधिक व्याज देऊ करते, त्या बँकेकडे ठेवीदारांचा ओढा अधिक असतो. मात्र, आता बचत खात्यावरही जास्तीचे व्याज मिळवता येऊ शकणार आहेत. त्यासाठी काही पर्यायांचा स्वीकार करावा लागणार आहे.

बचत खात्यावर मिळणारे व्याज किती?मोठ्या आणि नामांकित बँका बचत खात्यावर २.७० टक्के ते ३.५० टक्क्यांपर्यंत व्याज देतात. बँकनिहाय हा व्याजदर वेगवेगळा असतो.मात्र, बचत खात्यावर जास्त व्याज देऊ करणाऱ्या बँकाही आहेत. त्यासाठी ग्राहकांना खास सुविधा दिली जाते. या खास सुविधेला फ्लेक्सी अकाऊंट किंवा स्विप-इन सुविधा असे संबोधले जाते.

स्विप-इन सुविधा आहे काय?बचत खात्यात कितीही रक्कम असली तरी त्यावर एक निश्चित असे व्याजच मिळते. त्यामुळे खातेधारकांचा फारसा फायदा होत नाही.बचत खात्याला फिक्स्ड डिपॉझिटच्या खात्याशी लिंक करण्याची सुविधा बँकांमध्ये असते. या सुविधेनुसार खातेधारक बचत खात्यासाठी डिपॉझिटची एक ठरावीक रक्कम निश्चित करू शकतात.

त्याहून अधिक असलेली रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जाते. बचत खात्यात किती रक्कम ठेवायची आणि एफडी अकाऊंटमध्ये किती, हे खातेधारक निश्चित करू शकतात. याचा अर्थ खातेधारकाच्या बचत खात्यातील डिपॉझिट मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास अतिरिक्त रक्कम आपोआप एफडीमध्ये परावर्तित होते. एफडी खात्यात जमा झालेल्या रकमेवर एफडीसाठी लागू असलेले व्याज दिले जाते. यालाच स्विप-इन सुविधा असे म्हटले जाते.

शिल्लक रक्कम किती याकडे लक्ष ठेवाबचत खात्यात डिपॉझिट मर्यादेपेक्षा अधिक असेल तर एफडी अकाऊंट सुरू राहील. परंतु बचत खात्यातील शिल्लक रक्कम मर्यादेपेक्षा कमी असेल तर सरप्लस रकमेची एफडी समाप्त होते. या प्रक्रियेला स्विप-आऊट म्हणतात. त्यामुळे खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, याकडे खातेदाराने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

कोणत्या बँकांत सुविधा उपलब्ध?

स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय

टॅग्स :बँकगुंतवणूक