ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहक मिळवणाऱ्या रिलायन्स जिओने 2018 मध्ये आणखी एक धमका करण्याची तयारी सुरु केली आहे. 4G नंतर जिओ मार्केटमध्ये 5G सेवा इंटरनेट सेवा क्षेत्रात उतरणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी बार्सिलोनामध्ये झालेल्या वर्ल्ड काँग्रेसमध्ये रिलायन्स सॅमसंगसोबत नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. सॅमसंगसोबत जिओने 4 Gचा स्पीड वाढण्यासोबतच 5G इंटरनेट सेवा क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2018 पर्यंत रिलायन्स जिओ आणि सॅमसंगकडून 5G सेवेचा शुभारंभ केला जाऊ शकतो.नव्या प्रकल्पाच्या मदतीने देशभरातील 90 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट रिलायन्स जिओने ठेवले आहे. देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याचा आणि देशात 4 G सेवेसोबतच 5 G सेवा आणून डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचा मानस रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने व्यक्त केला आहे.
सॅमसंगसोबत JIO करणार आणखी एक धमाका
By admin | Updated: March 2, 2017 18:13 IST