Join us
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) ठाकरवाडी शाळेला इन्व्हर्टर भेट

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

चासकमान : कमान (ता. खेड) येथील ठाकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुबंई माता बालसंगोपन संस्थेकडून इन्व्हर्टर भेट देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते.

शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक मानले जाते. आदिवासी विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी त्यांच्याच दारात म्हणजे ठाकरवाडी या शाळेत मुंबई माता बालसंगोपन संस्था, राजगुरुनगर यांच्या वतीने आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेच्या वतीने शाळेस इन्व्हर्टर भेट देण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. माधव साठे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी संस्थेचे सहकार्य लाभत आहे. या प्रसंगी संस्थेच्या समन्वयक प्रिया भंडारी, शिंदे मॅडम, झेंडे, मांजरे, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नाईकरे, चेन्नोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोओळ- कमान (ता. खेड) येथील ठाकरवाडी शाळेतील आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
०००००