Join us
Daily Top 2Weekly Top 5

१३ मार्चपासून खात्यातून काढा हवी तितकी रक्कम

By admin | Updated: February 9, 2017 05:39 IST

येत्या २0 फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५0 हजार रुपये काढता येतील, तसेच १३ मार्चपासून पैसे काढण्यावरील निर्बंध हटविले जातील

मुंबई : येत्या २0 फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५0 हजार रुपये काढता येतील, तसेच १३ मार्चपासून पैसे काढण्यावरील निर्बंध हटविले जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली. नोटाबंदीनंतर बचत खात्यातून काढण्याच्या रकमेवर बंधने घातली होती. सध्या बचत खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतात. चालू (करंट) खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा याआधीच एक लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी रोजी ९.९२ लाख कोटी रुपये चलनात आणण्यात आले आहेत.