Join us  

Jio, Airtel, Vodafone Plans Hike: अ‍ॅमेझॉन प्राईममुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन महागणार; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 1:27 PM

Reliance jio, Airtel and Vodafone Recharge price hike: आता लवकरच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे प्रिपेड प्लॅन महाग होण्याची शक्यता आहे. या कंपन्या काही निवडक प्लॅनच्या किंमती वाढविणार आहेत.

लोकांना स्वस्त किंमतीत उत्पादने द्यायची आणि नंतर त्यांना त्याची सवय लागली की किंमती वाढवायच्या हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून कंपन्या करत आहेत. टेलिकॉम सेक्टरही यातून सुटलेले नाही. ग्राहकांना लाईफटाईम इनकमिंग सेवा मिळत होती. आता कार्ड सुरु ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज मारावे लागत आहे. तसेच कंपन्यांनी अनेक फ्री सेवा बंद केल्या आहेत. तसेच प्लॅनही आधीपेक्षा महाग केले आहेत. 

आता लवकरच रिलायन्स जिओ (Reliance jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन (Vodafone) आयडियाचे प्रिपेड प्लॅन महाग होण्याची शक्यता आहे. या कंपन्या काही निवडक प्लॅनच्या किंमती वाढविणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईमच्या (amazon prime membership) शुल्कात नुकतीच मोठी वाढ करण्यात आली आहे. आता हे सबस्क्रिप्शन 50 टक्क्यांनी महाग झाले आहे. जियो, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल कंपन्यांच्या काही रिचार्जवर अमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. मात्र, आता हेच सबस्क्रिप्शन महागल्याने टेलिकॉम कंपन्यांच्या या प्लॅन्सच्या किंमतीही वाढणार आहेत. 

टेलिकॉम कंपन्या यापुढे हे प्लॅन बंद करण्याची देखील शक्यता आहे. किंवा सबस्क्रीप्शनची मुदत कमी करण्याची शक्यता आहे. प्लॅन आधीसारखेच असतील मात्र कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. अ‍ॅमेझ़ॉनने देखील ज्या टेलिकॉम कंपन्या आपले सबस्क्रिप्शन देतात त्यांच्या प्लॅनवर फरक पडणार असल्याचे म्हटले आहे. 

नवीन अपडेटमुळे अमेजन प्राइम मेंबरशिपचे सबस्क्रिप्शन 999 रुपयांवरून 1,499 रुपये झाले आहे. याची वैधता 12 महिन्यांचीच आहे. तर 329 रुपयांचा तिमाहीचा प्लॅन 459 रुपयांचा झाला आहे. महिन्याचा 129 रुपयांचा प्लॅन 179 रुपये झाला आहे. या नव्या किंमती कधीपासून लागू होतील हे कंपनीने जाहीर केलेले नाही. अमेझॉन प्राईम पाच वर्षांपूर्वी भारतात लाँच करण्यात आले होते. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनजिओएअरटेलव्होडाफोन