Join us  

Amazon नं बदलली Great Indian Festival सेलची तारीख, आता 'या' तारखेपासून मिळणार डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 3:29 PM

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची तारीख आल्यानंतर ॲमेझॉननं आपल्या सेलची तारीख बदलली आहे.

Amazon Great Indian Festival Sale Offer: ॲमेझॉनचा सर्वात मोठा सेल, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Great Indian Festival Sale) आता ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉननं १० ऑक्टोबरपासून सेल सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु नंतर फ्लिपकार्टची तारीख आल्यानंतर सेलची तारीख बदलण्यात आली. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) ८ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार आहे.फ्लिपकार्टनं फेस्टिव्ह फ्लॅकशिप सेल केव्हा सुरू होणार याची तारीख नंतर जाहीर केली. त्यानंतर ॲमेझॉननं त्यांच्या सेलची तारीख बदलली आहे. फ्लिपकार्टकडून (Flipkart) सणांच्या सुरुवातीला बिग बिलियन डेज सेल चालवला जातो. बहुतेक दोन्ही कंपन्यांचा सेल एकाच वेळी चालतो. ॲमेझॉननं अद्याप आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधी संपणार हे सांगितलेलं नाही. फ्लिपकार्टचा सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.Amazon Prime मेंबर्सना मिळणार फायदानेहमीप्रमाणे ॲमेझॉननं प्राइम सदस्यांना ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून विक्री ऑफरमध्ये एन्ट्री मिळेल. ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनीनं आपल्या वेबसाइटवर डिस्काउंट आणि डील्सची माहिती दिली आहे. Amazon Great Indian Festival सेल दरम्यान, ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रचंड सूट मिळू शकते. यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट वॉचेस, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे.सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सेलई-कॉमर्स कंपन्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक ऑफर्स आणतात. सणासुदीच्या काळात विक्री ही कंपन्यांच्या एकूण मर्चेंडाईज व्हॅल्यूच्या (GMV) अंदाजे ५० टक्के असते. वाढत्या महागाईचा फारसा परिणाम होणार नाही. त्यांना असं वाटतं की मागील वर्षांच्या तुलनेत २०२३ हे वर्ष बेस्ट फेस्टिव्ह सीझन राहणार असल्याची माहीती कंपनीचे अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख मनीष तिवारी यांनी सांगितलं.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट