Join us
Daily Top 2Weekly Top 5

अॅमेझॉन - फ्लिपकार्टची ‘कॅश ऑन डिलीवरी’ सेवा बंद

By admin | Updated: November 10, 2016 21:31 IST

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन अग्रगण्य इ-कॉमर्स वेबसाइट्सनी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा बंद केली आहे. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 -  अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन अग्रगण्य इ-कॉमर्स वेबसाइट्सनी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा बंद केली आहे. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे कॅश ऑन डिलीव्हरी ही सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपुर्वी ज्या ग्राहकांनी कॅश ऑन डिलीव्हरीसाठी ऑर्डर केली असेल ते डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून अन्यथा वापरात असलेल्या रूपयांच्या नोटा देऊ शकतात असं अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं. 
अॅमेझॉनची कट्टर स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनेही कॅश ऑन डिलीव्हरी सेवा बंद केल्याचं सांगितलं तसंच ग्राहकांनी इंटरनेट बॅंकिंगचा किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गीफ्ट कार्डचा वापर करावा असं आवाहन केलं आहे.