Join us  

६०० चिनी कंपन्यांवर बंदी, ॲमेझॉनचा निर्णय; शेऱ्यांसाठी देत होते गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:06 AM

या कंपन्यांच्या कारवायांचा ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने पहिल्यांदा पर्दाफाश केला होता. ‘द व्हर्ज’ने केलेल्या चौकशीत असे आढळले होते की, वाईट शेरे दिलेल्या पोस्ट हटविण्यासाठी शेरे देणाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्याचे आमिष दाखविले जात होते.

नवी दिल्ली : आपल्या ई-कॉमर्स पोर्टलवरून विक्री होणाऱ्या ६०० चिनी ब्रँड्सवर ॲमेझॉनने बंदी घातली आहे. या ब्रँड्सशी संबंधित ३ हजार मर्चंट खात्यांवरही कंपनीने बंदीची कारवाई केली आहे. चांगले शेरे लिहिण्यासाठी हे ब्रँड्स ग्राहकांना आकर्षक गिफ्ट देत होते, असा आरोप आहे.

या कंपन्यांच्या कारवायांचा ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने पहिल्यांदा पर्दाफाश केला होता. ‘द व्हर्ज’ने केलेल्या चौकशीत असे आढळले होते की, वाईट शेरे दिलेल्या पोस्ट हटविण्यासाठी शेरे देणाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्याचे आमिष दाखविले जात होते. ॲमेझॉन एशिया ग्लोबल सेलिंगच्या उपाध्यक्ष सिंडी ताई यांनी सांगितले की, ही कारवाई चीन अथवा अन्य कुठल्या देशाला टार्गेट करण्यासाठी करण्यात आली नाही.  

टॅग्स :अ‍ॅमेझॉनचीनबाजार