Join us  

जीएसटीच्या धावपळीत व्हॅट आॅडिटकडेही लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:39 AM

प्रत्येक व्यापा-याने अचूक खरेदी विव्रष्ठीची माहिती देणे आवश्यक आहे. कर वाचविण्याच्या किंवा उलाढाल लपवून दोन पैसे कमविण्याच्या नादात अनेक व्यवहार केले जातात, परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात १ शासकीय विभाग एकमेकास करदात्याविषयी माहितीची देवाण-घेवाण करतात. त्यामुळे कर बुडविणारे व चुकविणारे आज ना उद्या उघडकीस येतील. म्हणून प्रत्येक करदात्याने अचूक माहिती देऊनच, आॅडिट रिपोर्ट आणि रिटर्न दाखल करावे.

- सी. ए. उमेश शर्माअर्जुन :कृष्णा, यातून करदात्यांनी काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, प्रत्येक व्यापा-याने अचूक खरेदी विव्रष्ठीची माहिती देणे आवश्यक आहे. कर वाचविण्याच्या किंवा उलाढाल लपवून दोन पैसे कमविण्याच्या नादात अनेक व्यवहार केले जातात, परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात १ शासकीय विभाग एकमेकास करदात्याविषयी माहितीची देवाण-घेवाण करतात. त्यामुळे कर बुडविणारे व चुकविणारे आज ना उद्या उघडकीस येतील. म्हणून प्रत्येक करदात्याने अचूक माहिती देऊनच, आॅडिट रिपोर्ट आणि रिटर्न दाखल करावे.अर्जुन (काल्पनीक पात्र) : कृष्णा, जीएसटी कायदा १ जुलैपासून लागू झाला, तर मग व्हॅट आॅडिटच्या संबंधित ८ डिसेंबर २०१७ला आलेले परिपत्रक काय आहे, याबद्दल सविस्तर सांग.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटी कायदा लागू झाला असला, तरी प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील करदात्याला वर्ष २०१६-१७चे व्हॅट आॅडिट लागू होत असेल, तर व्हॅट आॅडिट करून रिपोर्ट दाखल करणे अनिवार्य आहे, तसेच एप्रिल २०१६ पासून मासिक व्हॅटचे बिलवाइज रिटर्न दाखल करण्याची कार्यप्रणाली शासनाने आणली. जे करदाते एप्रिल २०१६ नंतर नोंदणीकृत झाले, त्यांना व्हॅट आॅडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुभा नव्हती. आता ती ८ डिसेंबर २०१७ला आलेल्या परिपत्रकाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.अर्जुन: कृष्णा, व्हॅट आॅडिट कोणाला लागू होते?कृष्ण: अर्जुना, व्यापारामध्ये वार्षिक उलाढाल किती आहे, यावरून रिटर्न भरावे व व्हॅट आॅडिट करावे की नाही हे ठरते. जर आर्थिक वर्षाची उलाढाल १ कोटीपेक्षा जास्त असेल, तर व्हॅट आॅडिट करून घेणे करदात्याला अनिवार्य आहे. आॅडिटमध्ये रिटर्न बरोबर आहेत का नाही, हे पुस्तकानुसार तपासले जाते. अनेकदा पुस्तके बरोबर न ठेवल्यामुळे करदात्याची चांगलीच फजिती होते.अजुर्न: कृष्णा, व्हॅट आॅडिट रिपोर्टमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?कृष्णा : अर्जुना, व्हॅट आॅडिटमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याचे पालन व त्यानुसार आॅडिट रिपोर्ट अनेक्चर जे १ व जे २ आहे. जे १ मध्ये करदात्याने ज्याला विव्रष्ठी केली आहे, त्याचा टीन नंबर व वार्षिक एकूण विव्रष्ठी व त्यावरील व्हॅट नमूद करावा लागतो, तसेच जे २ मध्ये खरेदीदाराचे टीन नंबर व वार्षिक एकूण खरेदी व त्यावरील व्हॅट नमूद करावा लागतो. जर ही माहिती चुकीची गेली, तर व्हॅट अधिकारी व्यापाºयाला व्याज व दंड आकारतो, तसेच विव्रष्ठी करणाºयाकडून सेटआॅफ न देता कर गोळा करतो.अर्जुन : कृष्णा, करदात्याने व्हॅट आॅडिटसाठी काय काळजी घ्यावी?कृष्ण : अर्जुना, करदात्याने खालील गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.१) करदात्याने व्हॅट आॅडिटसाठी दिलेले खरेदी विव्रष्ठीची माहिती आॅडिटेड ताळेबंद (बॅलेन्सशीट) नुसार जुळवून द्यावी.२) महाराष्ट्रातून खरेदी केलेल्या खरेदीवरच सेटआॅफ घ्यावा. सीएसटी डिक्लेरेशन फॉर्मस् म्हणजेच सी, एफ, एच, फॉर्मस्ची व्यवस्थित विव्रष्ठीच्या बिलाप्रमाणे नमूद करावे. फॉर्मस् गोळा करण्यात त्रास होतो व न मिळाल्यास कर भरावा लागतो.३) करदात्याने आर्थिक वर्षामध्ये भरलेल्या कराची माहिती, चलन, रिटर्न तयार ठेवावे. व्हॅट आॅडिट करण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत, नाहीतर अडचण येते.अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने व्हॅट आॅडिट रिपोर्ट वेळेवर दाखल केले नाही, तर काय होईल ?कृष्ण : अर्जुना, व्हॅट आॅडिट रिपोर्ट वेळेवर म्हणजेच १५ जानेवारी २०१८ च्या आधी दाखल केले नाही, तर एकूण विव्रष्ठी उलाढालीच्या १/१० टक्के इतका दंड लागू शकतो. म्हणजेच व्यापार करताना व्हॅट आॅडिट रिपोर्ट वेळेवर दाखल करावा.

टॅग्स :जीएसटीकरभारत