Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या ब्रँडचे सर्व अधिकार लक्स इनरवेअरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:54 IST

मुंबई : विराट कोहलीच्या ‘वनएट’ या प्रीमियम ब्रॅण्डचे उत्पादन व मार्केटिंगचे अधिकार लक्स इनरवेअर तयार करणा-या आर्टिमास फॅशन्स मिळाले आहेत.

मुंबई : विराट कोहलीच्या ‘वनएट’ या प्रीमियम ब्रॅण्डचे उत्पादन व मार्केटिंगचे अधिकार लक्स इनरवेअर तयार करणा-या आर्टिमास फॅशन्स मिळाले आहेत.आर्टिमासने ‘वनएट’चा परवाना असलेल्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट्सशी करार केला आहे. त्याद्वारे या ब्रॅण्डला ट्रेंडी इनरवेयर व प्रीमियम श्रेणीत सर्वाधिक यशस्वी केले जाणार आहे. लक्सकडे उत्पादनापासून ते वितरणाची देशातील सर्वात मजबूत साखळी आहे. त्याआधारे लक्सने ‘वनएट’ चे हे अधिकार मिळवले आहेत. याआधारे प्रीमियम इनरवेयर श्रेणीत आकर्षक उत्पादने आणली जातील, अशी माहिती लक्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष साकेत व उदित तोदी यांनी दिले.

टॅग्स :विराट कोहली