Join us  

एलआयसी पॉलिसीची सर्व माहिती मिळणार फोनवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 8:35 AM

LIC policy: भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास एजंटांकडे चकरा माराव्या लागतात; पण आता ही समस्या संपणार असून, पॉलिसीशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास एजंटांकडे चकरा माराव्या लागतात; पण आता ही समस्या संपणार असून, पॉलिसीशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. एलआयसीने काही नवीन योजना आणली असेल किंवा जुन्या योजनेत काही बदल केला असेल, तर त्याची सर्व माहिती फोनवर मिळू शकेल. तुमच्या हप्त्याशी संबंधित माहितीही तुम्हाला यात मिळू शकेल. त्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेचा तुम्हाला अवलंब करावा लागेल. 

अशी आहे प्रक्रियायासाठी प्रथम पाॅलिसीधारकास आपला मोबाइल क्रमांक एलआयसीची वेबसाइट www.licindia.in वर नोंदवावा लागेल. त्यानंतर सर्वांत वर दिसणाऱ्या ‘कस्टमर सर्व्हिस’ या बटनवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर अनेक ‘सब कॅटेगरी’ उघडतील. त्यात आपला संपर्क तपशील भरावा. त्यानंतर वापरकर्ता नव्या पेजवर येईल. येथे सांगितलेली सर्व माहिती भरल्यानंतर एक घोषणापत्र उघडेल. त्यावरील  YES बटनवर क्लिक करावे.त्यानंतर पाॅलिसी क्रमांक विचारला जाईल, तो भरावा. ‘व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्स’वर क्लिक करून क्रमांक पडताळणी करून घ्यावी. यानंतर तुम्हाला एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती तुमच्या फोनवर मिळत राहील.

टॅग्स :एलआयसी