Join us

ट्रम्प यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष, तिमाही निकाल, रुपयांची स्थिती ठरवेल पुढील दिशा

By प्रसाद गो.जोशी | Updated: January 20, 2025 06:16 IST

Stock Market: चलनवाढ फारशी झालेली नसली तरी महागलेला डॉलर, रुपयाने नोंदवलेला नवीन नीचांक आणि कंपन्याचे अपेक्षेपेक्षा कमी आलेले निकाल यामुळे सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार खाली आला.

- प्रसाद जोशी चलनवाढ फारशी झालेली नसली तरी महागलेला डॉलर, रुपयाने नोंदवलेला नवीन नीचांक आणि कंपन्याचे अपेक्षेपेक्षा कमी आलेले निकाल यामुळे सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार खाली आला. प्रमुख निर्देशांक सुमारे एक टक्क्यानी खाली आले. स्थानिक शेअर बाजारांची दिशा या आठवड्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भूमिका यावर अवलंबून असेल. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती व डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थितीही बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 

बाजारातून काढले २५२१८ कोटीपरकीय वित्त संस्थांची विक्री सूट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांकडून विक्री थांबण्याची कोणती चिन्हे दृष्टी बसत नाहीत. गत सप्ताहातही परकीय वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारमधून २५२१८.६० कोटी रुपये काढून घेतले आहेत या काळात देशांतर्गत वित्त संस्थांनी २५,१५१.२७ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.  

बाजारासाठी सावधानतेचा इशाराआगामी अर्थसंकल्प, अमेरिकेतील सत्ताबदल, बाजाराच्या विष्लेषकांनी आयटी आणि बँकिंग क्षेत्रात समभागांमध्ये वर्तवलेली घसरणीची शक्यता यामुळे आगामी सप्ताह बाजारासाठी सावधानतेचा संदेश देणार आहे. सलग दोन आठवड्यांची घसरण कायम राहणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. बँकिंग, आयटी निर्देशांकाने चांगली कामगिरी केली तरी या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक