Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बँक कर्मचाऱ्यांचा २८ फेब्रुवारीला संप

By admin | Updated: February 14, 2017 00:26 IST

कामगार कायद्यात होणारे बदल आणि बँकिंग यंत्रणेतील समस्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी सर्व सरकारी, खासगी व विदेशी बँकांमधील १० लाख बँक कर्मचारी

मुंबई : कामगार कायद्यात होणारे बदल आणि बँकिंग यंत्रणेतील समस्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी सर्व सरकारी, खासगी व विदेशी बँकांमधील १० लाख बँक कर्मचारी व अधिकारी २८ फेब्रुवारीला एक दिवस संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संघटनांची कृती समिती असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने सोमवारी ही माहिती दिली.संघटनेचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले की, नोटाबंदीनंतर बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जे जादा काम केले, त्याचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचाही सुळसुळाट झाला आहे. मात्र बनावट नोटा तपासणारी यंत्रे पुरवण्यात आलेली नाहीत. याशिवाय बँकांमध्ये आता मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे थांबवून तत्काळ कायमस्वरूपी तत्त्वावर भरती करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)