Join us  

'त्या' यूजर्सचे मोफत इनकमिंग कॉल होणार बंद; मोबाइल कंपन्यांचा 'जोर का झटका'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:37 PM

टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल युजर्सला जोराचा झटका हळूहळू देण्यास सुरुवात केली आहे.

अलिगड- टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल यूजर्सला जोराचा झटका हळूहळू देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोफत मिळणारी इनकमिंगची सुविधा मोबाइल कंपन्यांनी बंद केली आहे. आता यूजर्सला इनकमिंग कॉलसाठी महिन्या(28 दिवस)ला 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. अन्यथा आउटगोइंगच नव्हे, तर इनकमिंग सेवा बंद केली आहे. एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगच नव्हे, तर इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या. मोबाइलचा महाग असलेला डेटाही आता स्वस्त झाला आहे. त्यामुळे मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.प्रतिस्पर्धी कंपन्यांही स्वस्त इंटरनेट पॅक उपलब्ध करून टेलिकॉम बाजारात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आउटगोइंग कॉलही स्वस्त झाले आहेत. स्वस्त इंटरनेट प्लॅनमुळे यूजर्सचाही वापर वाढला आहे. या इंटरनेट पॅकमुळेच आऊटगोइंग कॉलही मोफत मिळत आहे. नवे सिम कार्डही 20 ते 30 वर्षांच्या वैधतेनुसार मिळत आहे. सध्या तरी अनेक युजर्स असे आहेत की, फक्त इनकमिंग कॉलसाठी मोबाईल वापरतात. फक्त मिस कॉल देण्यासाठी 10 ते 20 रुपयांचा रिचार्ज करतात. अशातच कंपन्यांनी ही मोफत इनकमिंग कॉलची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता महिन्याभराच्या इनकमिंग कॉलसाठी 35 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे.आतापर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा मोफत असल्यानं युजर्स सिम कार्ड ठेवत होते. परंतु आता त्यांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. महिन्याभराच्या इनकमिंगसाठी तुम्हाला 35 रुपयांसाठी रिचार्ज करावे लागणार आहे. तसेच तुम्हाला रिचार्जमध्ये 26 रुपयांचं बॅलन्सही मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता संपल्यानंतर तुमचं इनकमिंग कॉलही बंद होणार आहेत. रिचार्ज केल्यानंतर आधीचा बॅलन्सही त्यात अॅड होणार आहे. महाव्यवस्थापक केपी वर्मा म्हणाले प्रत्येक कंपनी अशा प्रकारचं शुल्क वसूल करत आहे. अशातच इनकमिंग कॉलसाठी नवा नियम बनवला आहे. 

टॅग्स :मोबाइल