Join us

आलिबाबा करणार निर्यात वाढीसाठी साह्य

By admin | Updated: March 14, 2017 23:55 IST

रिसेल वस्तूंची निर्यात करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आलिबाबा डॉटकॉम मदत करणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वतीने एक वर्कशॉप येथे आयोजित करण्यात आले

मुंबई : रिसेल वस्तूंची निर्यात करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आलिबाबा डॉटकॉम मदत करणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वतीने एक वर्कशॉप येथे आयोजित करण्यात आले. मुंबईप्रमाणेच सुरत आणि कानपूरमध्येही असे वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आहेत.भारतातील ३५0 रिसेलरांनी एकत्र येऊन ई-कॉमर्स व मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्यात संधी शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्यासाठी आलिबाबा डॉटकॉमने वर्कशॉपचे आयोजन केले होते. सोने, दागिने, कपडे, चामड्याच्या वस्तू या उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो; पण त्यांची क्षमता पूर्णांशाने वापरली गेली नाही, असे आलिबाबा डॉटकॉमचे ख्रिस वँग यांनी सांगितले.