Join us  

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! 'ही' सेवा 2 तास राहणार बंद; लवकर आटपून घ्या पैशांचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 1:34 PM

SBI Banking Services: एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, सिस्टमच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील.

नवी दिल्ली : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक  एसबीआयच्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. एसबीआयने ट्विटरवर (Twitter) अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, सिस्टमच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. तसेच, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत, असे एसबीआयने ट्विटद्वारे सांगितले आहे. याशिवाय, या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर उपक्रम टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे बँकेने म्हटले.  

यापूर्वी 04 सप्टेंबर रोजी देखभालीच्या कामामुळे एसबीआयची योनो सेवा सुमारे 3 तास बंद होती. याशिवाय, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखभालीमुळे एसबीआयने बँकिंग सेवा बंद केली होती. सहसा देखभाल काम रात्री केले जाते, त्यामुळे बरेच ग्राहक प्रभावित होत नाहीत.

दरम्यान, एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा 8 कोटीहून अधिक लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे 2 कोटी लोक करतात. दुसरीकडे, योनोवर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया