Join us

अक्षय तृतीयेला सोने तेजाळले

By admin | Updated: April 29, 2017 00:26 IST

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने ३0 रुपयांनी वाढून २९,४८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने ३0 रुपयांनी वाढून २९,४८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. जागतिक बाजारातही सोने तेजीत राहिले. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.१४ टक्क्यांनी घसरून १,२६५.३0 डॉलर प्रतिऔंस झाले.चांदीवर मात्र विक्रीचा दबाव राहिला. त्यामुळे चांदी २00 रुपयांनी उतरून ४0,५00 रुपये किलो झाली. औद्योगिक क्षेत्रातील, तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदीला फटका बसल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.