Join us

एअरटेलची 'सरप्राइज' ऑफर, 13 मार्चपासून इंटरनेट फ्री

By admin | Updated: March 6, 2017 19:11 IST

भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी 'एअरटेल सरप्राइज' ऑफर आणली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी 'एअरटेल सरप्राइज' ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये 13 मार्चपासून कंपनी पोस्टपेड ग्राहकांना मोफत डेटा देणार आहे. मात्र, किती डेटा देण्यात येणार आहे याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. 
 
एअरटेल आपल्या पोस्टपेड ग्राहकांना एक प्रमोशनल मेल पाठवत आहे. या मेलनुसार, युजर माय एअरटेल अॅपमध्ये जाऊन किती डेटा मोफत मिळणार आहे याबाबत माहिती घेऊ शकतात. आपल्याला देशातील सर्वात जलद मोबाइल नेटवर्कचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही आपल्याला काही प्रमाणात डेटा मोफत देत आहोत अशा आशयाचा मेल कंपनीकडून पाठवण्यात येत आहे. 
(JIO : प्राईम मेंबरशिप न घेतल्यास काय होईल?)
 
यापुर्वी एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी 345 रूपयांत 28 जीबी 3जी/4जी  डेटा आणि सर्व नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्सची ऑफर आणली आहे.