एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या स्वस्त रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. दुसरीकडे जर तुमच्या घरात वाय-फाय असेल तर हे रिचार्ज प्लान तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतील.
आम्ही एअरटेलच्या १८९ आणि १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल बोलत आहोत. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
एअरटेलचा १८९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या १८९ रुपयांच्या प्लानची वैधता २१ दिवसांची आहे. २१ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच ३०० फ्री एसएमएसचाही लाभ मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झाले तर युजर्संना या प्लानमध्ये एकूण १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. अशा परिस्थितीत वाय-फाय युजर्ससाठी हा प्लान खूप फायदेशीर ठरू शकतो. युजर्स त्यांच्या घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर ज्या ठिकाणी वायफाय नाही अशा ठिकाणी १ जीबी डेटा वापरू शकतात.
एअरटेलचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झालं तर युजर्संना या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. अशा परिस्थितीत वाय-फाय युजर्ससाठीही हा प्लान खूप फायदेशीर ठरणार आहे.