Join us

एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:09 IST

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्या व ग्राहक या दोघांच्याही हिताला बाधा येऊ शकते. याचा फक्त जिओ या कंपनीलाच फायदा होणार आहे, असा या कंपन्यांचा दावा आहे. ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी या कंपन्यांची मागणी अद्याप तरी टीडीसॅटने मान्य केलेली नाही. ट्रायने ४ आठवड्यांच्या आत उत्तर सादर करावे, असा आदेश टीडीसॅटने दिला आहे. ट्रायच्या उत्तरावर३ आठवड्यांच्या आत एअरटेल व आयडिया या २ कंपन्यांनी आपली बाजू मांडावयाची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

टॅग्स :एअरटेलआयडिया