Join us

एअरटेल धमाका: 345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 18:53 IST

एअरटेलची 345 रूपयांत 28 जीबी 3जी/4जी डेटा आणि सर्व नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्सची ऑफर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एकाहून एक सरस ऑफर आणत आहे. यावेळी एअरटेलने 345 रूपयांत 28 जीबी 3जी/4जी  डेटा आणि सर्व नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्सची ऑफर आणली आहे. यामध्ये यूजर्सना 500 एमबी डेटा दिवसा आणि 500 एमबी डेटा रात्री  वापरता येणार आहे.
 
याशिवाय दिवसाला 1 जीबी डेटा वापरणा-यांसाठी 549 रूपयामध्ये 28 दिवसांसाठी 28  जीबी डेटा मिळणार आहे.  जे युजर्स 31 मार्चआधी 345 किंवा 549 रूपयाचं पॅक घेतील त्यांना पुढील 11 महिन्यासाठी या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. 549 रूपयांच्या पॅकमध्ये एका आठवड्यात 1200 मिनीट कॉल फ्री मिळतील त्यानंतर 30 पैसे प्रतिमिनिट याप्रमाणे दर असतील.  
(एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)
 
दुसरीकडे व्होडाफोननेही  346 रुपयांत 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, तर आयडीयानंही 345 रुपयात 14जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड टेरिफ प्लानची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात जिओनं 303 रुपयात यूजर्सला 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग याची घोषणा केली आहे.