Join us  

भारतात लवकरच दिसणार बिकीनीतील हवाई सुंदरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 3:24 PM

विमानात प्रवास करताना आकर्षक, सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या हवाई सुंदरी (एअर होस्टेस) पहायला मिळतात. पण...

वियतनाम - अनेकांना विमानाचे प्रचंड आकर्षण असल्याचे आपण पाहतो. विमानाचा आवाज जरी आला तरी मान आपोआप आकाशाकडे उंचावते. अर्थातच विमान हा सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. किमान एकदा तरी आयुष्यात विमान प्रवास घडावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. विमानात प्रवास करताना आकर्षक, सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या हवाई सुंदरी (एअर होस्टेस) पहायला मिळतात. पण आता भारतामध्ये बिकीनीतील हवाई सुंदरी असलेली एअरलाइन्स येत आहे. त्यामुळं आता भारतातील विमानप्रवासात यापुढे बिकीनीतील हवाई सुंदरी असणार आहेत. 

वियतनाम येथील किफायतशीर एअरलाइन्स कंपनी वियतजेट लवकरच भारतात आपला बिजनेस सुरु करणार आहे. नवी दिल्ली ते हो ची मिन्ह या शहरापर्यंत ही सुविधा लवकरच सुरु होणार आहे. वियतजेट एअरलाइन्सच्या विमानामध्ये कोणताही  बिजनेस क्लास किंवा इकोनॉमी क्लास नसतो. यामध्ये सर्वांना समाव बसण्याची सोय असते.  

एअरलाइन्स कंपनी  भारतामध्ये जुलै ते ऑगस्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. आठवड्यातून चार वेळा या कंपनीचे विमान उड्डान घेणार आहे.  विमानामध्ये बिकीनीकील हवाई सुंदरी असणार आहेत. वियतनाममध्ये यावरुन अकेन वादही झाला आहे. पण वियतजेटने आपल्या भूमिकावर ठाम होता.