Join us  

एअर इंडियाची पुन्हा खासगीकरणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:57 AM

जागतिक पातळीवरील आर्थिक संकेतक आणि कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा झाल्यानंतर, एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा एकदा करील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील आर्थिक संकेतक आणि कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा झाल्यानंतर, एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा एकदा करील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. कंपनीच्या खासगीकरणाचा एक प्रयत्न अलीकडेच फसला आहे. कंपनीच्या हिस्सेदारी विक्रीच्या निविदेला कोणीही प्रतिसाद दिला नाही. याबाबत सिन्हा म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता व रुपयाच्या विनिमय दरातील चढउतार पाहता, सध्याची स्थिती धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यास अनुकूल नाही. जागतिक आर्थिक संकेतक स्थिर होतील, तेव्हा आम्ही त्यासाठी पुन्हा प्रयत्न करू.सिन्हा म्हणाले की, एअर इंडियामधील २४ टक्के हिस्सेदारी आपल्याकडेच कायम ठेवण्याचा सरकारचा निर्णय खासगीकरणाच्या मार्गातील प्रमुख अडसर ठरला. याशिवाय एअर इंडियावरील विशाल कर्ज आणि कंपनीचा नफ्याचा इतिहास या बाबीही प्रतिकूल ठरल्या.

टॅग्स :एअर इंडिया