Join us

हवाई इंधन, विना सबसिडीचा गॅस स्वस्त

By admin | Updated: September 2, 2015 00:08 IST

विमानाच्या इंधनाचे भाव मंगळवारी ११.७ टक्क्यांनी कमी करण्यात आले. घरगुती वापराचे विना अनुदान गॅस सिलिंडरही २५.५ रुपयांनी स्वस्त झाले आहे

नवी दिल्ली : विमानाच्या इंधनाचे भाव मंगळवारी ११.७ टक्क्यांनी कमी करण्यात आले. घरगुती वापराचे विना अनुदान गॅस सिलिंडरही २५.५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाल्यामुळे हा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला.एव्हिएशन टर्बाईन फ्युअल (एटीएफ) अर्थात विमानाचे इंधन दिल्लीमध्ये एक किलोलिटरमागे ५,४६९.१२ रुपयांनी (११.७ टक्के) स्वस्त झाल्यानंतर आता त्याचा भाव ४०,९३८.२१ रुपये किलोलिटर झाला आहे. १ जानेवारी २०१५ रोजी एटीएफच्या किमतीत १२.५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. सध्या दोन, तीन व चारचाकी वाहनांसाठी वापरले जाणारे पेट्रोल हे विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलपेक्षा ३३ टक्क्यांनी महाग आहे. मंगळवारपासून पेट्रोल २ रुपयांनी लिटरमागे स्वस्त झाल्यानंतर दिल्लीत त्याचा भाव ६१.२० रुपये असून विमानाचे इंधन ४०.९३ रुपये लिटर आहे.विमान कंपन्यांच्या महसुलाचा ४० टक्के भाग हा इंधनावर खर्च होतो. आता तेच स्वस्त झाल्यामुळे रोख पैशाच्या टंचाईला तोंड देणाऱ्या कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इंधन स्वस्त झाल्यामुळे प्रवासी भाड्यात कपात होणार का याबद्दल कोणत्याही कंपनीने लगेचच भाष्य केलेले नाही.