एडस् दिनानिमित्त पथनाट्य सादरीकरण
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या आंतरवासिता डॉक्टर मुलींनी एडस् दिनानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण केले.
एडस् दिनानिमित्त पथनाट्य सादरीकरण
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या आंतरवासिता डॉक्टर मुलींनी एडस् दिनानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण केले.एडस् दिनानिमित्त दंतमहाविद्यालयासमोर उत्कृष्ट प्रबोधनात्मक पोस्टर्स लावले होते. बी.डी.एस. झालेल्या आंतरवासिता मुलींनी अत्यंत उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण केले. पूजा सदामते, पूनम अचलकर, नेहा आबदार, शरयू चव्हाण, पीयूशा पाटील, करिश्मा मुल्लानी, सुरुची गणबावले, पल्लवी रांजणे, जयश्री भांगरे, ऋतुजा भोई, वैष्णवी बुगड, आदींनी सहभाग घेतला.यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव कोरे, प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. गायत्री कुलकर्णी, ओरल मेडिसिन विभागाचे डॉ. विणा पुजारी, डॉ. अशोक गळव, ओरल सर्जरीचे डॉ. शहानवाज काझी, डॉ. इथेशाम, डॉ. ज्योती यांचे मार्गदर्शन लाभले.