Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत, थायलंडमध्ये विविध क्षेत्राशी संबंधित करार

By admin | Updated: June 30, 2015 02:23 IST

भारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली.

बँकाक : भारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री तानासाक पातिमप्रगोर्म यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रत्यार्पण करारावर २०१३ मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. दस्तऐवजांच्या देवाण-घेवाणीमुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग मिळणार आहे.