Join us

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात तेजी

By admin | Updated: May 26, 2015 00:06 IST

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव २५ रुपयांच्या सुधारणेसह २७,४७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव २५ रुपयांच्या सुधारणेसह २७,४७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारात घसरणीचा कल असताना आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मागणीमुळे ही तेजी दिसून आली. चांदीचा भावही औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या खरेदीने २५० रुपयांनी वधारून ३९,०५० रुपये प्रतिकिलो राहिला. सूत्रांनी सांगितले की, सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आभूषण निर्मात्यांच्या खरेदीत वाढ नोंदली गेली. तथापि, अमेरिकी बाजारात घसरणीचा कल दिसून आला. व्याजदरातील वाढीमुळे अमेरिकी डॉलर महिनाभराच्या उच्चांकावर गेला. परिणामी सोन्याची मागणी घटली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.१४ टक्क्यांनी घटून १,२०४.२० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.५ टक्क्यांच्या घसरणीसह १६.९९ डॉलर प्रतिऔंस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)४राष्ट्रीय राजधानीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,४७५ रुपये आणि २७,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या दोन दिवसांत यात २०० रुपयांची घट नोंदली गेली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,८०० रुपयांवर अपरिर्वतनीय राहिला. ४तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी वाढून ३९,०५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २०० रुपयांनी उंचावून ३९,०२५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५७,००० रुपये व विक्रीकरिता ५८,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला.