Join us
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक दुरुस्तीनंतर शेअर बाजार पुन्हा सुरु

By admin | Updated: July 3, 2014 13:28 IST

गुरुवारी सकाळी झालेला शेअर बाजारातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून दुपारनंतर शेअर बाजारातील व्यवहार पून्हा सुरु झाले आहेत.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३-  तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी सकाळपासून ठप्प असलेले शेअर बाजारातील व्यवहार दुपारनंतर पुन्हा सुरु झाला आहेत. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शेअर बाजारातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. 
 
गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजारमध्ये (बीएसई) तांत्रिक अडचणीमुळे दर अपडेट होत नव्हते. यामुळे काही वेळाने बीएसईमधील व्यवहार प्रक्रीयाच ठप्प पडली.बीएसईचे तांत्रिक विभाग सांभाळणा-या एचसीएल टेक या कंपनीने तांत्रिक बिघाड दुुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु केले. अखेरीस तीन तासांनी यावर मात करण्यात तज्ज्ञांना यश आले आणि शेअर बाजारातील व्यवहार पुन्हा सुरु झाले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील व्यवहार सकाळपासून सुरु होते. त्यामुळे एनएसईला याचा फटका बसला नाही. बीएसईमधील नेटवर्क बंद पडण्यापूर्वी झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.