नवी दिल्ली : महत्त्वाकांक्षी जन-धन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडलेल्या गरिबांना उपलब्ध असलेल्या ३० हजार रुपयांच्या विमा संरक्षण योजनेची पाच वर्षांनंतर चिकित्सा केली जाईल. या खातेदारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विम्याचे हे संरक्षण दिले जात आहे.अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, या योजनेंतर्गत ३० हजार रुपयांचे विमा संरक्षण पहिली पाच वर्षे किंवा २०१९-२०२० या आर्थिक वर्षापर्यंत असेल. या नंतर या योजनेची चिकित्सा केली जाईल. लाभार्थीचा विमा हप्ता भरणे आदी निर्णय नंतर घेतले जातील, असेही निवेदनात म्हटले आहे. १५ आॅगस्ट २०१४ ते २६ जानेवारी २०१५ यादरम्यान प्रथमच बँकेत खाते उघडणारी व्यक्ती जीवन विमा योजनेची लाभार्थी आहे. सध्या तरी या बँक खातेदारांच्या विम्याचा हप्ता भरण्यास आयुर्विमा महामंडळाला सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत एलआयसीच जीवन विम्याचे संरक्षण उपलब्ध करून देते. कुटुंब प्रमुखाला या जीवन विम्याचे संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
‘जन-धन’ विम्याची पाच वर्षांनंतर होणार चिकित्सा
By admin | Updated: February 2, 2015 03:50 IST