Join us

घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:16 IST

ज्या अनिवासी भारतीयांचे लग्न वेगवेगळ्या संस्कृतीत झाले आहे त्यांचे पालक देखील याचा वापर करत आहेत असं कायदे तज्ज्ञ सांगतात. 

नवी दिल्ली - भारतात आतापर्यंत लग्नाआधी होणाऱ्या कराराला (Prenuptil Agreements) कायदेशीर मान्यता नाही. त्यासाठी श्रीमंत लोक लग्न मोडल्यानंतर होणाऱ्या आर्थिक नुकसानीला टाळण्यासाठी नवीन फंडा शोधत आहेत. प्रायव्हेट फॅमिली डिस्क्रेशनरी ट्रस्ट(Private Family Discreationary Trust) हा असाच एक फंडा आहे. ज्याला सध्याच्या काळात घटस्फोटानंतर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वापरले जात आहे. 

दिल्लीतील एका कपडा निर्यातदाराने सांगितले की, माझ्या मुलाचे लग्न काही काळातच मोडले.  ट्रस्ट तयार करून आम्ही लग्नाआधीच आमच्या मुलाचा व्यवसाय आणि कुटुंबाचे घर सुरक्षित केले होते असं त्यांनी म्हटलं.  त्याचप्रमाणे मुंबईतील एका प्रसिद्ध ज्वेलर्सने त्यांची सर्व मालमत्ता ट्रस्टमध्ये ठेवली आणि त्यांच्या मुलाला लाभार्थी बनवले. जेव्हा मुलाने घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा पत्नीला त्या मालमत्तेवर कोणताही दावा करता आला नाही. ज्या पूर्वी तिला स्वत:च्या वाटत असायच्या. इकोनॉमिक्स टाईम्सनं हे वृत्त दिले आहे.

काय आहे ट्रस्टचा वापर?

इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेसचे संस्थापक रजत दत्ता म्हणतात की, ट्रस्टचा अर्थ असा आहे की त्या ट्रस्टीद्वारे लाभार्थ्यांच्या हिताचे रक्षण करता येईल. जर कर्जदार बँकेचे पैसे परत करण्यास असमर्थ असेल तर बँक ट्रस्टमध्ये ठेवलेली मालमत्ता जप्त करू शकत नाही, जरी कर्जदार ट्रस्टी असला आणि लाभार्थी देखील असला तरीही. याचा अर्थ असा की ट्रस्ट एका प्रकारे मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी काम करते. सध्या हा फंडा केवळ श्रीमंत लोकांपर्यंत पोहचला आहे परंतु आता मध्यमवर्गीयही त्याचा वापर करू लागले आहेत. ते स्वत:ची कमाई सुरक्षित ठेवू इच्छितात आणि त्यांना कौटुंबिक कायदेशीर लढाईपासून वाचायचे आहे, विशेषत: घटस्फोटासारख्या प्रकरणात याचा वापर होतो.

ट्रस्ट महिलांनाही सुरक्षा देतो. एका वकिलाने म्हटलं की, एका महिलेला वारंवार तिच्या पतीकडून पैसे मागण्याचा त्रास होता परंतु ती तिची संपत्ती वाचवण्यासाठी यशस्वी राहिली कारण ती ट्रस्टमध्ये होती. हा ट्रस्ट तिच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या मुलांसाठी बनवला होता. ही पद्धत पारंपारिक कुटुंबे देखील अवलंबत आहेत ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरक्षित ठेवायचा आहे. याशिवाय, ज्या अनिवासी भारतीयांचे लग्न वेगवेगळ्या संस्कृतीत झाले आहे त्यांचे पालक देखील याचा वापर करत आहेत असं कायदे तज्ज्ञ सांगतात. 

कसा बनवला जातो ट्रस्ट?

एवेंडस वेल्थ मॅनेजमेटच्या फॅमिली ऑफिस सॉल्यूशंसच्या प्रमुख अश्विनी चोपडा सांगतात की, अनेक कुटुंबातील मुले लग्नानंतर होणाऱ्या आर्थिक जोखीमेपासून वाचण्यासाठी ट्रस्ट बनवत आहेत. खासकरून जेव्हा लग्न त्यांच्या जाती आणि धर्माबाहेर झाले असेल. ट्रस्ट अशाप्रकारे बनवले जाते त्यात कायदेशीरपणे मुलाच्या नावावर कुठलीही संपत्ती नसते, तो केवळ लाभार्थी म्हणून राहतो. त्यामुळे घटस्फोटावेळी संपत्तीवर पत्नीने दावा करण्याचा अधिकार कमी होतो. आता ट्रस्ट डीड घटस्फोटाला लक्षात ठेवून बनवल्या जात आहेत. याआधी याचा वापर केवळ वारसा सांभाळण्यासाठी होता. 

टॅग्स :न्यायालय