Join us

मोठ्या घसरणीनंतर चीनमधील बाजार बंद

By admin | Updated: January 8, 2016 03:06 IST

चीनचा शेअर बाजार गुरुवारी सकाळी पहिल्या अर्धा तासातच विक्रमी सात टक्क्यांनी घसरला. त्यामुळे स्वयंचलित सर्किट ब्रेकर लागून बाजार दिवसभरासाठी बंद करण्यात आला

शांघाय : चीनचा शेअर बाजार गुरुवारी सकाळी पहिल्या अर्धा तासातच विक्रमी सात टक्क्यांनी घसरला. त्यामुळे स्वयंचलित सर्किट ब्रेकर लागून बाजार दिवसभरासाठी बंद करण्यात आला. चिनी बाजाराच्या इतिहासात सर्वांत कमी म्हणजेच फक्त ३0 मिनिटे काम चाललेले सत्र म्हणून या सत्राची इतिहासात नोंद झाली. प्रचंड घसरणीमुळे बाजार बंद करावा लागण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सोमवारीही सर्किट ब्रेकर लागले होते. सर्किट ब्रेकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यापासून सोमवारी तिचा पहिल्यांदाच वापर झाला होता. शांघाय आणि शेनझेन येथील बाजारांत नोंदणीकृत कंपन्यांतील ३00 ब्ल्यूचिप कंपन्यांचा समावेश असलेला हुशेन निर्देशांक ७ टक्क्यांपेक्षाही जास्त घसरल्यानंतर सर्किट ब्रेकर लागले होते. जेव्हा निर्देशांक ५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरतो किंवा वाढतो तेव्हा १५ मिनिटांचे सर्किट ब्रेकर लागते. हुशेन निर्देशांक ७ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरल्यास बाजार दिवसभरासाठी बंद केला जातो. चिनी चलन युआन ३३२ बेसिक पॉइंटांनी ६.५६४६ प्रति डॉलरवर आला. १८ मार्च २0११ नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. जपानमधील टोकियो येथील शेअर बाजाराचा निर्देशांक निक्केई ३२४.२८ अंकांनी घसरला.