Join us

जाहिरात पार्टी - नर्सिंग कॉलेजमध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

By admin | Updated: September 2, 2014 22:40 IST

अकोला : मुकुंद एज्युकेशन सोसायटी, वाशिमद्वारा संचालित लेट. पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज, अकोला येथे गणेशोत्सवानिमित्त कायदेविषयक जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या संचालिका वसुधा गडेकर यांची उपस्थिती लाभली.

सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतप्रीत्यर्थ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कॉलेज प्राचार्यांनी करून दिला. कार्यक्रमामध्ये पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी आपल्या भाषणात ब्रिटिश सत्तेवर असताना लोकमान्य टिळकांनी सगळे भारतीय तरुण एकत्र येऊन एकमेकांशी जुळतील व ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला कसे वाचविता येईल, हा इतिहास सांगितला. तसेच देश जर घडवायचा असेल, तर सर्वप्रथम आपल्याला स्वत:ला घडवावे लागेल त्याचबरोबर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण योग्यप्रकारे पूर्ण करून समाजसेवा करण्याचे आवाहन चंद्रकिशोर मीणा यांनी त्यावेळी केले व कायदेविषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली.
आभारप्रदर्शन निशा यांनी केले. हा कार्यक्रम घडवून आणण्याकरिता कॉलेज शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग दर्शविला. (वाणिज्य प्रतिनिधी)

८ बाय ६