Join us

जाहिरात बातमी आवश्यक बुलडाणा अर्बनतर्फे जगन्नाथपुरी - गंगासागर यात्रेचे आयोजन

By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST

अकोला - ग्राहकांच्या हितांना सर्वतोपरी स्थान देणार्‍या तसेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या बुलडाणा अर्बनच्यावतीने येत्या जानेवारी व फेब्रुवारी २०१५ मध्ये जगन्नाथपुरी - गंगासागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा ५ रात्री व ६ दिवसांची राहणार आहे. जगन्नाथपुरी - गंगासागर सोबतच कोलकाता येथील काली मंदिर, वेलुरमठ, कोणार्क येथील कोणार्क मंदिर, भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर व मुक्तेश्वर मंदिर या स्थळांचेही दर्शन होणार आहे. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या वाढदिवसापासून अर्थात गुरुवार, २ ऑक्टोबरपासून या यात्रेची बुकिंग सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ३०० च्या वर यात्रेकरूंची बुकिंग झाली आहे.

मागील वर्षी बुलडाणा अर्बनने ११०० यात्रेकरूंची द्वारका, सोमनाथ यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते. त्याबद्दल भाविकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले होते. यावर्षीदेखील चार धामपैकी एक असलेल्या जगन्नाथपुरी तसेच गंगासागर व इतर धार्मिक स्थळांची यात्रा बुलडाणा अर्बनद्वारे आयोजित करण्यात येत आहे.
ही यात्रा १९ जानेवारी २०१५ पासून सुरू होणार असून, प्रत्येक बॅचमध्ये फक्त ६० सीट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता बुकिंगची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर असून, बुलडाणा अर्बनच्या प्रत्येक शाखेवर बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
(जाहिरात बातमी - औरंगाबाद, मराठवाडा, जळगाव, नागपूर, अकोला.)
फोटो - ०५ सीटीसीएल ५०
८ बाय १० मध्ये घ्यावी
---------------