Join us  

पेंट उद्योगात बिर्ला ग्रुपची ग्रँड एंट्री; 3 वर्षात 10000 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 5:44 PM

Birla Opus: भारतातील पेंट सेक्टरचा टर्नओव्हर 80,000 कोटी रुपये आहे.

Aditya Birla Group Update: भारतातील पेंट उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून एशियन पेंट्स, बर्जर आणि नेरोलॅकसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण, आता या क्षेत्रात अजून एका कंपनीची एंट्री झाली आहे. सिमेंट क्षेत्रातील दिग्गज आदित्य बिर्ला ग्रुपने पेंट्स व्यवसाय सुरू केला आहे. समूहाने बिर्ला ओपस नावाने पेंट्स व्यवसायात प्रवेश केला आहे. 

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी पानिपत, हरियाणात बिर्ला ओपस पेंट्सचा नवीन डेकोरेटिव्ह पेंट्स ब्रँड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी बिर्ला ओपसचा लोगोही लॉन्च केला. कंपनीने पुढील तीन वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. बिर्ला ओपसच्या नावाने पेंट्स व्यवसाय सुरू करण्यासाठी बिर्ला ग्रुपने 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

बिर्ला ओपसची उत्पादने पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये मार्च 2024 च्या मध्यापासून उपलब्ध होतील, तर जुलै 2024 पासून भारतातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जातील. कंपनीने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 6,000 शहरांमध्ये वितरण नेटवर्क तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतातील कोणत्याही पेंट ब्रँडचे हे सर्वात जलद पॅन इंडिया लॉन्च असेल.

बिर्ला ओपस लॉन्चिंगवेळी कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, आदित्य बिर्ला समूहाला बांधकाम साहित्याच्या क्षेत्रााचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे बिर्ला आपली क्षमता वाढवून ओपस पेंट्स उद्योगाचा कायापालट करेल. विशेष म्हणजे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिर्ला ओपस थेट पेंटिंग सेवादेखील सुरू करत आहे, ज्याद्वारे अनेक उत्पादने आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

टॅग्स :गुंतवणूकव्यवसायकुमार मंगलम बिर्ला