स्वातंत्र्य दिन जोड 3
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST
आगर: परिसरात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आगर येथे महात्मा फुले विद्यालय प्रांगणामध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीमध्ये संस्थाध्यक्ष राजेंद्र काळणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला. मुख्य कार्यक्रम ग्रा.पं. कार्यालयामध्ये पार पडला. या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव व सर्व सहकारी, दीपक पाटनकर, दांदळे, जि.प. शाळांचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर व शिक्षक अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी, कर्मचारी ग्रा.पं. पदाधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व गावातील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ग्रा.पं. कार्यालयावर सरपंच सतीश काळणे, जि.प. शाळेवर केंद्र प्रमु
स्वातंत्र्य दिन जोड 3
आगर: परिसरात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आगर येथे महात्मा फुले विद्यालय प्रांगणामध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीमध्ये संस्थाध्यक्ष राजेंद्र काळणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला. मुख्य कार्यक्रम ग्रा.पं. कार्यालयामध्ये पार पडला. या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव व सर्व सहकारी, दीपक पाटनकर, दांदळे, जि.प. शाळांचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर व शिक्षक अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी, कर्मचारी ग्रा.पं. पदाधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व गावातील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ग्रा.पं. कार्यालयावर सरपंच सतीश काळणे, जि.प. शाळेवर केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर, उर्दू शाळेवर पं.स. सदस्य गंगाबाई अंभारे,से.स.सो. कार्यालयावर अध्यक्ष राजंेद्र काळणे यांनी ध्वज फडकावला. आगर येथून जवळच असलेल्या गट ग्रा.पं. लोणाग्रा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रा.पं. कार्यालयामध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथे जि.प. प्रा. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा.पं. पदाधिकारी यंाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सुधाकर पाटील यांनी ध्वज फडकावला तर जि.प. शाळेमध्ये मुख्याध्यापक बोरसे यांनी ध्वज फडकावला. यावेळी ग्रा.पं.मध्ये ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षपदी सुधाकर पाटील हे होते. यावेळी सचिव पी.डी. भाकरे यांनी शासनाच्या विविध योजनांचे वाचन केले. एकमताने तंटामुक्त समितीची कार्यकारिणी निवडून सुरेंद्रपाटील यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. खांबोरा येथे उपसरपंच तथा सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि.प. शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी ध्वज फडकावला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व मान्यवर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, तलाठी आदी कर्मचारी उपस्थित होते. दुधाळा गट ग्रा.पं. मध्ये सरपंच अंजली गवई तर जि.प. शाळेमध्ये गणेश बोबडे यांनी ध्वज फडकावला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते. टाकळी जलम गट ग्रा.पं. मध्ये स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.शाळेतमुख्याध्यापकयांचे हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळीसरपंच लक्षमनबिल्लेवार, ग्रा.पं. सदस्य प्रशांत बोर्डे, रंजना सावळे, उमाबाई बोर्डे यांचेसह जि.प. शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस पाटील बाळू बिल्लेवार हे उपस्थित होते.