Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाची आता सीबीए सल्लागार नाही

By admin | Updated: August 6, 2015 22:27 IST

भारतीय खाण कंपनी अदानीला गुरुवारी आणखी एक झटका बसला. पर्यावरणाच्या मुद्यावर आॅस्ट्रेलियाच्या न्यायालयाने १६.५ अब्ज डॉलरच्या

मेलबर्न : भारतीय खाण कंपनी अदानीला गुरुवारी आणखी एक झटका बसला. पर्यावरणाच्या मुद्यावर आॅस्ट्रेलियाच्या न्यायालयाने १६.५ अब्ज डॉलरच्या अदानींच्या कोळसा खाण प्रकल्पाची मान्यता ५ आॅगस्ट रोजी रद्द केल्यानंतर आॅस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ बँक आॅफ आॅस्ट्रेलियाने (सीबीए) अदानी कंपनीची आर्थिक सल्लागार म्हणून काम बघण्यास नकार दिला आहे. सीबीए ही आॅस्ट्रेलियातील सगळ्यात मोठी बँक आहे. आमची सल्लागाराची भूमिका आता संपुष्टात आली आहे, असे बँकेच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ‘द एज’ या वृत्तपत्राने म्हटले.या प्रकल्पातून बँकेने आम्ही का अंग काढून घेत आहोत याचा तपशील दिला नसला तरी कोळशाच्या घसरत्या किमती आणि अदानींच्या प्रकल्पाशी पर्यावरणाचे जोडलेले प्रश्न या पार्श्वभूमीवर आर्थिक जोखीम घेणे हा बँकेसाठी काळजीचा विषय बनला होता.