Join us  

... तर Youtube वर Free Video पाहणं होणार बंद! आता युझर्सना द्यावे लागू शकतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 2:07 PM

युट्युबमध्ये (Youtube ) काळानुसार बदलत होत असतात.

युट्युबमध्ये (Youtube ) काळानुसार बदलत होत असतात. सध्या, YouTube जाहिरात ब्लॉकर्स विरुद्ध उभं ठाकलं आहे. अॅड ब्लॉकर वापरणाऱ्या अशा यूजर्ससाठी आता कंपनी स्पीड कमी करणार आहे. याचा अर्थ आता तुम्ही अॅड ब्लॉकर वापरत असल्यास तुम्ही पाहत असलेल्या व्हिडीओचा वेग कमी होणार आहे. गेल्या वर्षभरापासून युट्यूबकडून हे बदल केले जात होते, मात्र आता ते लागू करण्यात आले आहेत.

काही युझर्सना स्लो लोडिंग टाईमची समस्या येत आहे आणि त्यांच्याकडे आता एकमेव पर्याय आहे की जाहिरात ब्लॉकरसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे किंवा प्रीमियम प्लॅन खरेदी करावा. कमी होत असलेल्या कमाईच्या पार्श्वभूमीवर YouTube ची अॅड ब्लॉकिंग रणनीती आखण्यात आली आहे. कारण जेव्हा युझर्स जाहिराती ब्लॉक करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम कमाईवर होतो. Youtube Views अॅड ब्लॉकिंग्स टर्म्स ऑफ सर्व्हिसेसचं उल्लंघन मानलं जातं.

जर एखाद्या युझरला अॅड फ्री कंटेन्टचा आनंद घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी YouTube द्वारे स्वतंत्र पेड प्रीमियम सर्व्हिस दिली जाते. त्याच्या मदतीने, YouTube भरपूर कमाई करते. पण आता बरेच लोक थर्ड पार्टी अॅड ब्लॉकर वापरत आहेत. आता याला सामोरं जाण्यासाठी कंपनीने वेगवेगळ्या रणनीतींवर काम सुरू केलंय.

युट्युब करणार मेसेज

पहिली पद्धत म्हणजे पॉप-अप मेसेजेसच्या मदतीनं ते थांबवलं जातं. कारण अॅड ब्लॉकर वापरण्याचा थेट अर्थ असा होतो की तुम्ही YouTube च्या टर्म ऑफ सर्व्हिस मर्यादित करत आहात. यानंतर, युझर्सना एक मेसेज देखील पाठवला जातो आणि त्यांना अॅड ब्लॉकर काढून टाकण्याची विनंती केली जाते. परंतु यामुळे अनेक युझर्सना काही फरक पडत नाही. तर दुसऱ्या रणनीतीनुसार युट्युबद्वारे व्हिडीओचा स्पीड कमी केला जातो.

टॅग्स :यु ट्यूब