Join us

थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Updated: June 21, 2017 01:22 IST

१२ बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यास सोमवारी येथे बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १२ बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यास सोमवारी येथे बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली. या थकबाकीदारांची नोंदणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे (एनसीएलटी) महिनाभरात करण्याबाबत बँकांना सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी कायद्यांतर्गत या १२ बड्या थकबाकीदार कंपन्यांची नावे गत आठवड्यात समोर आणली आहेत. यात एमटेक अ‍ॅटो, भूषण स्टील, एस्सार स्टील, भूषण पॉवर अँड स्टील, अलोक इंडस्ट्रिज, मोनेट इस्पात, लॅनको इन्फ्रा, इलेक्ट्रोस्टील, इरा इन्फ्रा, जिप्सी इन्फ्राटेक, एबीजी शिपयार्ड आणि ज्योती स्ट्रक्चर या कंपन्याचा थकबाकीदारात समावेश आहे. या थकबाकीदारांवरील कारवाईची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.