जसवंत तुली आयनॉॅक्स मॉलवर कारवाई
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
जसवंत तुली आयनॉॅक्स मॉलवर कारवाई
नागपूर : मनपा, आसीनगर झोनच्या कर व कर आकारणी विभागाने २.१५ कोटींचा थकीत कर वसुलीसाठी जसवंत तुली आयनॉक्स मॉलवर बुधवारी सकाळी कारवाई केली. या मॉलमध्ये अनेक प्रतिष्ठान असून या कारवाईचा फटका सर्वच प्रतिष्ठानांना बसला. मॉल व्यवस्थापनाने उपरोक्त राशीचा भरणा केल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. बुधवार सायंकाळपासून आयनॉक्सचे सर्व शो सुरळीत सुरू झाले. या कारवाईशी आयनॉक्सचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण ऑयनॉक्सने दिले आहे.