Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकाउंट नंबरची पोर्टेब्लिटी हवी

By admin | Updated: February 6, 2015 01:37 IST

मोबाईल क्रमांक कायम राखत मोबाईल सेवा बदलण्याची मुभा देणारे ‘पोर्टेब्लिटी’चे तंत्रज्ञान जर मोबाईल कंपन्यांनी अवगत करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे,

मुंबई : मोबाईल क्रमांक कायम राखत मोबाईल सेवा बदलण्याची मुभा देणारे ‘पोर्टेब्लिटी’चे तंत्रज्ञान जर मोबाईल कंपन्यांनी अवगत करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, तर बँकांनीही अशा तंत्रज्ञानाचा अवलंब का करू नये?, अशा तंत्रज्ञानाचा वापर जर बँकिंग उद्योगात झाला तर त्याचा निश्चित फायदा ग्राहक व बँका या दोन्ही घटकांना होईल, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस.मुन्द्रा यांनी व्यक्त केले.येथे बँकिंग उद्योगाशी संबंधित झालेल्या कार्यक्रमात ते बोलतहोते. मोबाइलच्याच धर्तीवर, जर ग्राहकाला बँकेतून समाधानकारक सेवा मिळत नसेल तर तोच खाते क्रमांक कायम राखत बँक खाते बदलण्याची मुभा मिळायला हवी, असे मत मुन्द्रा यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)च्कारणमीमांसा स्पष्ट करताना मुन्द्रा म्हणाले, आता बँक खात्याचा नंबर विविध प्रकारचे कर्ज देणाऱ्या बँकेत नोंदलेला असतो तसेच प्राप्तिकर खात्यातही त्याची नोंद असते. तोच क्रमांक कायम राखत ग्राहकाने बँक बदलली तरी त्याची अन्य कोणतीही आर्थिक गैरसोय होणार नाही.