Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब, किती हे सीईओंचे पगार!

By admin | Updated: July 5, 2015 23:35 IST

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याच्या २०५ पट जास्त वेतन मिळते

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याच्या २०५ पट जास्त वेतन मिळते. गेल्या सात वर्षांत अंबानी यांनी वेतनवाढ घेतलेली नाही. आयटीसीचे कार्यकारी अध्यक्ष वाय.सी. देवेश्वर यांचे वेतन त्यांच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या ४३९ पट जास्त आहे. एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे वेतन १९ पट, तर विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे ८९ पट, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक आदित्य पुरी यांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ११७ पट आहे.