Join us

1 लाख मे.वॅ.सौर विजेसाठी लागणार 110 अब्ज डॉलर

By admin | Updated: December 10, 2014 23:38 IST

सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाने (एसईएसआय) म्हटले की, 2019 र्पयत सौरऊर्जेची क्षमता 1 लाख मेगावॅटर्पयत वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

नवी दिल्ली : भारताला सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याची मोठी संधी आहे. सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाने (एसईएसआय) म्हटले की, 2019 र्पयत सौरऊर्जेची क्षमता 1 लाख मेगावॅटर्पयत वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 110 अब्ज डॉलरची गुंतवणूक लागेल. एसईएसआय ही संस्था इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटीची भारतीय शाखा आहे. 
एसईएसआयचे अध्यक्ष राजेंद्र के कौरा यांनी ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ रिन्युएबल एनर्जी’ या परिषदेत सांगितले की, भारताला सौरऊर्जेचा वापर करून 1 लाख मेगावॅट वीज निर्माण करण्याची मोठी संधी आहे. सरकारने तसे लक्ष्यही ठरविले आहे. 2019 या वर्षार्पयत हे लक्ष्य गाठायचे आहे. या मार्गात निधीची उपलब्धता हीच मोठी समस्या आहे. 110 अब्ज डॉलरचा निधी त्यासाठी लागेल. मात्र, त्यातून मोठा लाभही देशाला होईल. जीडीपीची 2 टक्के अतिरिक्त वाढ त्यातून साध्य करता येईल. 20 लाख नवे रोजगार निर्माण होतील. 
यात सौरऊर्जेचा वाटा मोठा ठेवल्याशिवाय हे शक्य होणार नाही. आपल्या औद्योगिक विकासाला आम्ही आणखी गती द्यायला हवी. अन्यथा 50 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक चीनकडे जाण्याचा धोका आहे. 
 
4एसईएसआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कौरा यांनी सांगितले की, कोणत्याही देशाची आर्थिक वाढ ही विजेच्या वापरावर अवलंबून असते. 
4जितका वीज वापर जास्त तितकी वाढ जास्त. भारतासारख्या तेजीने वाढणा:या अर्थव्यवस्थेसाठी विजेचा वापर वाढविणो गरजेचे आहे.
4 2019 सालार्पयत 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे.