Join us

वृद्धीदराच्या बळावरच गरिबी हटविणे शक्य

By admin | Updated: January 9, 2016 00:54 IST

देशाची सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) वृद्धी आणखी पुढे नेण्यासाठी राज्यात मजबूत वृद्धी मिळविणे आवश्यक आहे, असे झाले तरच दारिद्र्याचा

कोलकाता : देशाची सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) वृद्धी आणखी पुढे नेण्यासाठी राज्यात मजबूत वृद्धी मिळविणे आवश्यक आहे, असे झाले तरच दारिद्र्याचा मुकाबला केला जाऊ शकेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.बंगाल जागतिक व्यावसायिक संमेलनात बोलताना जेटली यांनी हे मत मांडले. ते म्हणाले की, प्रतिकूल जागतिक परिस्थिती असूनही भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.५ टक्के आहे. त्यात आणखी एक टक्क्याची भर घालणे कठीण आहे काय? वृद्धीदर वाढला तर गरिबीशी संघर्ष करण्यास व रोजगार निर्मितीत मदत मिळेल.