Join us

बजाजने सादर केली अ‍ॅव्हेंजरची नवी मालिका

By admin | Updated: October 28, 2015 21:49 IST

दुचाकी वाहनांच्या निर्मितीत देशात अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने आपल्या लोकप्रिय अशा अ‍ॅव्हेंजर या बाईकची तीन नवीन मॉडेल्स सादर केली

मुंबई : दुचाकी वाहनांच्या निर्मितीत देशात अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने आपल्या लोकप्रिय अशा अ‍ॅव्हेंजर या बाईकची तीन नवीन मॉडेल्स सादर केली. अ‍ॅव्हेंजर २२० क्रूझ, २२० स्ट्रीट आणि १५० स्ट्रीट अशी या तीन नव्या मॉडेल्सची नावे आहेत. कंपनीचे अध्यक्ष एरिक वास यांनी सांगितले की, तरुणाईला आकर्षित करेल अशी स्टाईल आणि दणकट परफॉर्मन्स या दोन घटकांकडे लक्ष देत नव्या गाडीची निर्मिती केली आहे.१५० सीसी ते २२० सीसी दरम्यान इंजिनची क्षमता असलेली अशी ही तीन मॉडेल्स असून उत्कृष्ट सस्पेंशन हे गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ७५ हजार रुपये ते ८४ हजार रुपयांच्या दरम्यान गाडीची किंमत आहे. गाडीचे उत्पानद पुण्यातील चाकण इथे होत आहे.