Join us  

हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 6:23 AM

अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.

नवी दिल्ली : डिसेंबर हा यावर्षीची अखेरचा महिना आहे. आर्थिक घडामाेडींच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामे या डिसेंबरमध्ये उरकून घ्या. त्यात दिरंगाई झाल्यास बराच त्रास सहन करावा लागू शकताे. ही कामे काेणती? जाणून घेऊ या...

म्युच्युअल फंडातील नामांकन आवश्यकम्युच्युअल फंडाच्या फाेलिओमध्ये नामांकन जाेडणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नामांकन नसेल तर १ जानेवारीपासून फाेलिओतून विक्री व इतर व्यवहार करता येणार नाही.

आधारचे अपडेटआधार कार्ड काढून १० वर्षे झाली आणि एकदाही त्यातील माहिती अपडेट केलेली नाही, अशा लाेकांसाठी १४ डिसेंबरपर्यंत माेफत अपडेट करण्याची मुदत आहे. ऑनलाइन अपडेट माेफत करता येईल. त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क आकारण्यात येईल.

अग्रीम आयकर भरणा व आयकर विवरणज्यांचे आयकर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांना अग्रीम कर भरावा लागताे. अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरण्यासाठी डिसेंबरची मुदत आहे. १५ डिसेंबरपूर्वी करदात्यांना ७५ टक्के अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे. सुधारित आयकर भरणे किंवा आयकर भरण्यास उशीर झाला असेल तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ठराविक दंड भरून हे काम करता येईल.

याकडेही लक्ष असू द्याअनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.आरबीआय ८ तारखेला पतधाेरण जाहीर करणार आहे. त्यात व्याजदर कायम ठेवण्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :बँकआधार कार्ड