Join us  

९४ टक्के आयटी अभियंते ‘बिनकामाचे’ -  सी. पी. गुरनानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:15 AM

देशातील ९४ टक्के आयटी अभियंते नोकरीसाठी योग्य नसून आयटी कंपन्या केवळ ६ टक्के अभियंत्यांनाच नोकरी देतात, असे परखड मत टेक महिंद्राचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : देशातील ९४ टक्के आयटी अभियंते नोकरीसाठी योग्य नसून आयटी कंपन्या केवळ ६ टक्के अभियंत्यांनाच नोकरी देतात, असे परखड मत टेक महिंद्राचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी व्यक्त केले.टेक महिंद्राच्या नवीन सुविधेचा शुभारंभ दिल्लीत झाला. त्या वेळी गुरनानी म्हणाले की, महाविद्यालयांत दरवर्षी तयार होणाऱ्या अभियंत्यांमध्ये कौशल्याचा अभाव असतो. मोठ्या शहरातील एखादा विद्यार्थी बारावीत ६० टक्के गुण मिळाल्यानंतर, इंग्रजीत बीए करण्यासाठी समोर येत नाही, पण असा विद्यार्थी अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी लगेच तयार होतो. यावरून देशात तयार होणाºया अभियत्यांमध्ये कौशल्याचा अभाव कसा आहे, हे स्पष्ट होते.कुठल्याही आयटी नोकरीसाठी प्रोग्रामचे लॉजिक मांडण्याचे कौशल्य ही किमान गरज असते, पण हे कौशल्य आज फक्त ४.७७ टक्के अभियत्यांकडेच आहे. देशातील ५०० महाविद्यालयांमधील ३६,००० अभियांत्रिकी विद्यार्थी आयटीशी निगडित ‘आॅटोमेटा’ हा अभ्यासक्रम शिकतात, पण केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांनाच हा अभ्यास समजतो व फक्त १.४ टक्के अभियंते त्यामधील कोड व्यवस्थित मांडतात, हे वास्तव असल्याची खंत गुरनानी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञान