Join us  

सप्टेंबर महिन्यात जीएसटी अंतर्गत जमा झाला 92,150 कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 4:44 PM

जीएसटी कररचनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात एकूण 92,150 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

नवी दिल्ली - जीएसटी कररचनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात 42.91 लाख उद्योगांकडून  एकूण 92,150 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. या महिन्यात जीएसटीला चार महिने पूर्ण होतील. 1 जुलै 2017 पासून जीएसटी कररचना लागू झाली. 

केंद्रीय जीएसटीमधून 14,042 कोटी रुपये, स्टेट जीएसटीमधून 21,172 कोटी, एकात्मिक करातून 48,948 कोटी जमा झाले त्यातले आयजीएसटीमधून 23,951 कोटी रुपये जमा झाले. सेसमधून 7988 कोटी रुपये जमा झाले. 

23 ऑक्टोंबरपर्यंत 42.91 लाख जीएसटीआर 3 बी रिर्टन फाईल झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या जीएसटीसाठी 3 बी रिर्टन फाईल करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोंबर होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी रिर्टन फाईल करणा-यांना लेट फिसमधूनही सरकारने सवलत दिली आहे. 

जुलै महिन्यात जीएसटी अंतर्गत एकूण 95 हजार कोटीपेक्षा जास्त महसूल गोळा झाला होता. ऑगस्ट महिन्यात 91 हजार कोटी आणि आता सप्टेंबर महिन्यात 92,150 कोटी महसूल जमा झाला आहे. कर रचनेतील जटिलता संपवण्यासाठी जीएसटी अंतर्गत वेगवेगळे कर एकत्र करुन एकच कररचना लागू करण्यात आली. 

टॅग्स :अरूण जेटली