Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-इस्रायलमध्ये ९ करार, मोदी - नेतान्याहू यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 04:05 IST

भारत आणि इस्रायल यांच्यात सोमवारी सायबर सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करारासह एकूण ९ करार झाले.

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यात सोमवारी सायबर सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करारासह एकूण ९ करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या या कराराने द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. भारत आणि इस्रायल कृषी, तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांनी ही माहिती दिली. तेल व गॅस क्षेत्रातील सहकार्य, चित्रपट सहनिर्मिती आणि हवाई परिवहन या क्षेत्रांतही करार करण्यात आले. दूरगामी संरक्षण व्यूहरचना, दहशतवाद यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेते असल्याचे गौरवोद्गार काढत नेतान्याहू म्हणाले की, आपण भारतात क्रांती करत आहात आणि भारत व इस्रायल संबंध नव्याउंचीवर नेत आहात. दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह परस्पर हिताबाबतही त्यांनी चर्चा केली. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे शिष्टमंडळासह सहा दिवसांच्या भारत दौºयावर आले आहेत.इस्रायलकडे कृषी, संरक्षण यांच्यासह अनेक क्षेत्रांतील उच्च तंत्रज्ञान आहे. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. गतवर्षी मोदी इस्रायल दौ-यावर गेले होते तेव्हा कला-संस्कृती, तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांत करार झाले होते. आता झालेले करार त्यापुढचा टप्पा समजला जात आहे.

टॅग्स :बेंजामिन नेतन्याहू